महापालिका पार्किंगसाठी वाहनतळ उभारण्याचा निर्णय

नवी मुंबई शहरात पार्किंग सुविधेचा बोजवारा उडालाअसून वाहनचालकांना सतत वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने ठिकठिकाणी पार्किंगसाठी वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऐरोली सेक्टर-५ मधील आरक्षित भूखंडावर महापालिका वाहनतळ उभारणार असून यासाठी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या भूखंडासमोरील बाजूस नाट्यगृह प्रस्तावित असून, मागीलबाजूस मंगल कार्यालय व मार्केट परिसर आहे. त्यामुळे या:Eभागात होणारी बेकायदा पार्किंग तसेच भविष्यात वाहनांची वाढणारी वर्दळ यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका याठिकाणी वाहनतळ विकसित करणार येणार आहे. हे वाहनतळ उभारण्यास महापालिकेला सुमारे दोन कोटी १९ लाख रुपये. खर्च अपेक्षित आहे.