नोकरीसाठी तरुणांचा पुन्हा एल्गार

सरकारने याबाबत दखल घेतली नाही तर आत्मदहनाचा इशारा या तरुणांनी दिलाय. आंदोलनाची धग लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आझाद मैदानात जाऊन तरुणांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं. सरकारचे प्रतिनिधी, वकील आणि आंदोलकांमध्ये चर्चा घडवून आणण्याचं आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना दिलं. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात प्रचंड मोठं आंदोलन झालं होतं. लाख लाखांचे मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने आरक्षण मंजूर केलं. नंतर त्यासाठी कोर्टात लढाई सुरू आहे. काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या आणि महत्त्वाचे मुद्दे : * मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात आरक्षण,★ अधिसुचनेनुसार केवळ उन्नत आणि प्रगत गटाखालील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळणार,★ ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण, विशेष प्रवर्ग बनवून मराठा समाजाला आरक्षण.